गणपतीपुळे गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने रविवारपासून टाळेबंदीचा निर्णय
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामकृती व वाडीकृती दलाची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये गणपतीपुळे गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने रविवारी(ता. २५) सकाळी ६ ते ३० एप्रिल रात्री ९ वाजेपर्यंत गणपतीपुळे गावात पूर्णतः टाळेबंदीचा निर्णय घेण्यातआला आहे.गणपतीपुळे हे प्रसिद्ध देवस्थान व नावाजलेले पर्यटनस्थळआहे. सध्या संचारबंदीमुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्पझाला आहे. तरीही दुसऱ्या लाटेचा प्रभाव गणपतीपुळे परिसरात दिसू लागला आहे. रुग्णांची संख्या वाढूलागल्याने प्रादुर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने
सुरक्षिततेसाठी पाऊ उचलले आहेत. गावामध्ये कडकटाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे३०एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
www.konkantoday.com