कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेले ‘कलर कोड’ नियम मागे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेले ‘कलर कोड’ नियम मागे घेण्यात आले आहे. तसेच पत्रकच मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर लावल्याचे तपासादरम्यान निर्माण निदर्शनास आले.
www.konkantoday.com