विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा
नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होऊन २४ रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच अजून एक धक्कादायक घटना घडली आहे. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली आहे.
www.konkantoday.com