लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा रात्री उशिरा सोशल मीडियावर पसरली होती. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सुमित्रा महाजान यांचे निधन झाल्याचं ट्विट केलं होतं. मात्र ही अफवा असल्याचं समजल्यानंतर शशी थरुर यांनी ट्विट डिलिट केलं आणि त्यांच्या निरोगी दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, या प्रकरणावर सुमित्रा महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, न्यूज चॅनेल्सनी कशी काय याबाबत बातमी चालवली? त्यांनी किमान एकदा इंदौर प्रशासनाला तरी विचारायचं होतं.
www.konkantoday.com