
महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस आज राज्यात येणार
कोरोनाचा प्रादुर्भाव, रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासतोय. अशावेळी महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास १०० टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे
www.konkantoday.com




