
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ९८३ शिक्षकांना प्रशासनाने सहभागी करून घेतले
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमधील ९८३ शिक्षकांना प्रशासनाने सहभागी करून घेतले आहे. हे शिक्षक रेल्वे स्थानक, बस स्थानक, कोविड लसीकरण व कोविड चाचणी केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत.
www.konkantoday.com