ऑनलाइन रजिस्ट्रेशन करुनही रत्नागिरी येथील तिन्ही केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

गेल्या काही दिवसांत लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत त्यामुळे तीन चार दिवसांपूर्वी रत्नागिरी शहरातील तिन्ही केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती याची प्रशासनाने दखल घेऊन ऑनलाइन रजिस्ट्रेशन द्वारेच लसीकरणाचा निर्णय घेतला होता परंतु असे असूनही आज सकाळी झाडगाव आरोग्यकेंद्र, मिस्त्री हायस्कूल लसीकरण केंद्र व कोकणनगर येथील लसी करण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती प्रत्येक केंद्रावर अंदाजे नागरिकांची दोनशे ते अडीचशे नागरिकांची गर्दी होती ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना अनेकांनी नऊ ते अकराची वेळ घेतली होती परंतु त्यांची संख्या किती असावी याचा निर्बंध साइटवर नसल्यामुळे एकाचवेळी अनेक लोक तेथे उपस्थित झाले त्यातच अनेकांना हे रजिस्ट्रेशन करणे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली झाडगाव केंद्रावर अनेकजण रजिस्ट्रेशन करून लसीकरणासाठी गेले असता तेथील गर्दी असल्यामुळे त्यांना परतावे लागले आहेत मग रजिस्ट्रेशन करून वेळ घेऊन फायदा काय असा सवाल ते विचारत आहेत याशिवाय या ठिकाणी एका खात्याच्या बऱ्याच लोकांनी गर्दी केल्याने सर्वसामान्यांना लसीकरण मिळू शकले नाही अशी त्यांची तक्रार आहे कोकणनगर लसीकरण केंद्रावर सकाळी गर्दी उसळली होती या केंद्रांवर सामाजिक संस्थांच्या मदतीने शिस्त लावून लसीकरण पार पडले त्यानंतर ही गर्दी कमी झाली याबाबत ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आली असता याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले तसेच लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्यास थेट केंद्रावर लसीकरण करण्याचा निर्णय घेता येईल असे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button