सैतवडे येथील खतीब, गुम्बद मोहल्लातील वीज वाहिनी बदलण्याची मागणी
रत्नागिरी:- वीज ग्राहकांना येणाऱ्या पावसाळ्यात अखंडित वीज पुरवठा सुरू राहण्यासाठी मान्सून पूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे महावितरणने असली तरी तालुक्यातील सैतवडे येथील खतीब मोहल्ला व गुम्बद मोहल्ल्यातील काही भागातील जुनाट वीज वाहिनी न बदलल्याने या ठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची व अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
कोकणातील जंगल, डोंगर दर्याचा तसेच वादळी वारा आणि पाऊस यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. यामुळे प्रत्येक वीज वहिनीचे बारकाईने निरीक्षण करून त्यावर येणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यात याव्यात असे निर्देश सर्व शाखा अभियंता यांना देण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात १९७१ साली वीजवाहिनी जोडण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात या गावातील काही भागातील वीजवाहिनी बदली करण्यात आली होती. पण संपूर्ण खतीब मोहल्ला व गुम्बद मोहल्लातील काही भागातील वीज वाहिनी बदलण्यात आलेली नाही. सध्याच्या स्थितीत या वीजवाहिनीला दोन-तीन ठिकाणावर जोडण्यात आलेले असून येणाऱ्या पावसाळ्यामध्ये एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापूर्वी यात भागामध्ये वीज वाहिन्यांवरती वादळी वाऱ्यामुळे पडझड होऊन वीज वाहिन्या तुटून काळोखाचे साम्राज्य निर्माण झालं होतं. या भागात नेहमीप्रमाणे अंधारमय स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्याने या भागाची योग्य पद्धतीने पाहणी करून पावसाळ्यापूर्वी ही वीजवाहिन्या बदलून लोकांना पावसाळ्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवावे व या भागातील संबंधित अधिकाऱ्याने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत वीजवाहिन्या बदलण्याची कार्यवाही करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
www.konkantoday.com