
देवरुख येथील कोविड सेंटरसाठी समत्व ट्रस्ट तर्फे दोन बेडच्या रकमेची देणगी
संगमेश्वर तालुक्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता माननीय तहसीलदार सुहास थोरात साहेब देवरुख यांनी देवरुख येथे कोविड सेन्टर उभारण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी देणगी स्वरुपात बेड (रुग्णशय्या) देण्याचे आवाहन केले.त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून समत्व ट्रस्ट तर्फे अध्यक्ष.संतोषजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन बेडची रक्कम मा.तहसीलदार साहेबांकडे सुपूर्त करताना विश्वस्त .नरेंद्र खानविलकर साहेब.जेष्ठ समाज सेवक .बाळासाहेब पंदेरे.अंत्रवली गावच्या तलाठी सौ.ढाकणे मँडमआदी उपस्थित होते
www.konkantoday.com