
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले २ लाख रूपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्याला पोलीस कोठडी
सिंधुदुर्गनगरी : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले २ लाख रूपये देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्रीकांत नारायण चव्हाण याची जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी थेट सावंतवाडी जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथील श्रीकांत चव्हाण याने स्वाती गोळवणकर हिला जिल्हा परिषदेत लिपिकपदावर नोकरीला लावतो, असे सांगून तिच्याकडून ४ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी तिच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते त्यानंतर नोकरी न देता पैसे देण्यास टाळाटाळ करत होता म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती
www.konkantoday.com