
वैश्य युवा संघटना रत्नागिरीने उचलली कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या चहा नाश्त्याची जबाबदारी
सामाजिक कार्यात स्थापनेपासून अग्रेसर राहिलेल्या रत्नागिरीतील वैश्य युवा संघटनेने यावेळी कोरोनाग्रस्त नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील कोविड रुग्णालयात असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज सकाळी चहा नाश्ता मोफत पुरवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. रामनवमी पासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून जास्तीत जास्त दिवस हा उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त सापडू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. रत्नागिरी शहरातील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णाच्या चिंतेने घरातील नातेवाईक देखील रुग्ण दाखल असलेल्या कोविड सेंटरच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी वास्तव्य करतात. या नातेवाईकांना सकाळी चहा आणि नाश्ता मोफत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रत्नागिरीतील वैश्य युवा संघटनेने उचलली आहे.
बुधवारी रामनवमीपासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शहरात सर्वाधिक रुग्ण असलेल्या महिला रुग्णालय येथे बुधवारी रुग्णांच्या नातेवाईकांना चहा आणि नाश्ता पुरवण्यात आला. दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अल्पोहार व चहाची व्यवस्था वैश्य युवा संघटना रत्नागिरी मार्फत करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी वैश्य युवाच सर्व बहुसंख्य सदस्यांनी तसेच वैश्य समाजातील दानशूर व्यक्तीनि सढळ हस्ते मदत केली आहे.
बाहेरगावावरून येणार्या व कोविडग्रस्त रुग्णांच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी सकाळी अल्पोपहार व चहाची व्यवस्था झाल्याने नातेवाईकांची एक चांगली सोय झाल्याचे समाधान नातेवाईकांनी व्यक्त केले.
www.konkanyoday.com