
रत्नागिरी जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या वाढू लागली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. या रूग्णांसाठी जिल्हा शासकीय रूग्णालय तसेच महिला रूग्णालयांबरोबरच आता डेडिकेटेड कोरोना रूग्णालये (डी. सी. एच. सी.) तसेच कोरोना केअर सेंटर (सी. सी. सी) येथील खाटाही अपुऱ्या पडू लागल्याने आता जिल्हा प्रशासनाने ज्या रूग्णांना अजिबातच लक्षणे नाहीत किंवा साैम्य लक्षणे आहेत, अशा रूग्णांना होम आयसोलेशनमध्ये रहाण्याची परवानगी दिली आहे. सध्या लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांचीच संख्या अधिक असल्याने जिल्ह्यात होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे. जिल्ह्यात सध्या होम आयसोलेशनमध्ये दोन हजारपेक्षा अधिक रूग्ण आहेत.
www.konkantoday.com