रत्नागिरीत लागल्या लसीकरण केंद्रासमोर मोठया रांगा
शासनाने सध्या पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्याचे आदेश दिले असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण चालू आहे मात्र लसीकरणासाठी आवश्यक असलेला लसींचा साठा नियमित उपलब्ध होत नाही जिल्ह्याला दोन दिवसआड लसी उपलब्ध होत आहेत असे असताना नागरिक मात्र लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत अनेक केंद्रांवर लसींचा साठा अपुरा असल्याने नागरिकांची गर्दी वाढत आहे रत्नागिरी शहरातील झाडगाव केंद्रात नागरिकांनी लस घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती
www.konkantoday.com