कोरोना तपासणी अहवाल आता थेट मोबाईल वर मिळणार
रत्नागिरी – कोरोना बाबत करण्यात आलेल्या आर टी -पीसीआर तपासणी बाबत असणारा अहवाल आता तपासणी करणार्या व्यक्तीला थेट त्याच्या मोबाईल वर एका लिंक द्वारे अशी व्यवस्था रत्नागिरीतील जिल्हा कोव्हीड रुग्णालयातर्फे करण्यात आली आहे.
याबाबत एक सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून तपासणीच्या वेळी येणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक याठिकाणी नोंदवून घेतला जातो. चाचणीचा निकाल येताच संबंधित मोबाईल वर एक लिंक पाठवण्याची व्यवस्था आता करण्यात आली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह हे आता तपासणी करणार्या व्यक्तीला घरबसल्या कळू शकणार आहे.
जिल्हा कोव्हीड रुग्णालयातील डॉक्टर अर्जुन सुतार यांनी ही अद्ययावत व्यवस्था आज उपलब्ध करून दिली आहे. हा अहवाल रुग्णाला कसा प्राप्त होईल तसा त्याच वेळी तो आय सी एम आर ला पाठवण्याची यात व्यवस्था आहे.
सदर अहवाल पीडीएफ स्वरूपात असणार असून याची प्रिंट देखील संबंधित व्यक्तीला सोबत काढून ठेवता येणे शक्य होईल.
www.konkantoday.com