अवघ्या हजार रुपयांत कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल तयार करून देणाऱ्या दुकलीला मुंबईत अटक
लॅबच्या मुळ अहवालात फेरफार करून अवघ्या हजार रुपयांत कोरोनाचा बनावट निगेटिव्ह अहवाल तयार करून देणाऱ्या दुकलीला साेमवारी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. राशीद शकील शेख (३२), बिलाल फारुख शेख (२४) अशी अटक करण्यात आलेल्या दुकलीची नावे असून, त्यांच्याकडे पाेलीस अधिक तपास करत आहेत.
www.konkantoday.com