लॉकडाउन उठवल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही -काँग्रेसचे नेते भाई जगताप
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रद्वेषी आहेत. मुंबईचे फायनान्स सेंटर त्यांनी अहमदाबादला नेले. देवेंद्र फडणवीस यांनी गुजरात मॉडेलचे अनुकरण करताना महाराष्ट्र कसा मागे राहिल तेच पाहिलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा फोन घ्यायला पंतप्रधानांना वेळ नाही, पण पश्चिम बंगाल निवडणुकीत प्रचार करायला त्यांना वेळ आहे. रेमडेसिवीर प्रकरणात भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचं नाक कापलं. एकदा लॉकडाऊन संपू दे. लॉकडाउन उठवल्यानंतर फडणवीस आणि भाजपला सळो की पळो करून सोडल्याशिवाय गप्प बसणार नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करू”, असा इशारा काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी दिला.
www.konkantoday.com