रत्नागिरीतील प्रत्येक औद्योगिक आस्थापनेने कोव्हीड केअर सेंटर अगर एकत्र येऊन कोव्हीड हॉस्पिटल उभारावे – अँड.दिपक पटवर्धन

रत्नागिरीमध्ये कोव्हीड रुग्णांचे वेगाने वाढणारे प्रमाण आरोग्य व्यवस्थेमधील मर्यादा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता, शासनाचे या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे रत्नागिरीमध्ये रुग्णांचे हाल होत आहेत. पूर्वलक्षी नियोजन नसल्याने व सत्ताधाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवून वेळीच निर्णय घेत अंमलबजावणी न केल्याने आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी मध्ये असलेल्या फिनोलेक्स, जिंदाल, गद्रे मरीन्स, जे.के. फाइल्स इत्यादी अस्थापनानी कोव्हीड केअर सेंटर तात्काळ उभारावे. त्या अस्थापनातील कोव्हीड बाधित रुग्ण तसेच अन्य कोव्हीड रुग्ण यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी हे काम खूप उपयुक्त ठरेल यासाठी वैद्यकीय व्यवस्था तसेच नर्सिंग कॉलेजमधील ज्येष्ठ वर्गातील विद्यार्थी यांचे जवळ संपर्क करून स्वतःची कोव्हीड केअर सेंटर अगर कोव्हीड हॉस्पिटल उभे करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण उभे करावे. मोठ्या कंपन्या अगर आस्थापनानी या कोव्हीड महामारी मुळे निर्माण परिस्थितीचा विचार करून कोव्हीड केअर सेंटर अगर कोव्हीड हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय तात्काळ करावा असे आवाहन अँड. दीपक पटवर्धन भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button