पाच एलआयसी विमा प्रतिनिधींनामानाचा एमडीआरटी बहुमान प्राप्त ,विकास अधिकारी चंद्रशेखर पटवर्धनांची विक्रमी कामगिरी

रत्नागिरीः कोरोनाच्या संकटातही एलआयसीच्या रत्नागिरी शाखेतील पाच विमा प्रतिनिधींना या आर्थिक वर्षात अमेरिकेतील मानाचा एमडीआरटी बहुमान प्राप्त झाला आहे. येथील आघाडीचे विकास अधिकारी चंद्रशेखर पटवर्धन यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली या प्रतिनिधींनी योगदान दिले आहे. एलआयसी रत्नागिरी शाखेच्या विमा व्यवसायाच्या इतिहासात प्रथमच पाचजणांना हा मान मिळाला आहे.
विकास अधिकारी पटवर्धन यांच्या पाच प्रतिनिधींना एकाचवेळी हा मान प्राप्त होण्याची विक्रमी कामगिरी केली आहे. त्यांच्या संघटनेतील प्रसाद हातखंबकर, सुनीता कातकर, ऋता पंडित, योगेश नातू आणि शिल्पाताई पटवर्धन या पाच विमा प्रतिनिधींनी हा मान प्राप्त केला आहे. चार विमा प्रतिनिधी एमडीआरटी 2021 साठी तर शिल्पाताई पटवर्धन या एमडीआरटी 2022 या वर्षासाठी अवघ्या 3 महिन्यात पात्र झाल्या आहेत. जवळपास 30 ते 35 लाख रुपये प्रथम विमा हप्त्याचा विमा व्यवसाय हा या एमडीआरटी मानांकनासाठी आवश्यक असतो. आयुर्विमा व्यवसायात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो.
एलआयसी विमा क्षेत्रामध्ये विमा प्रतिनिधी म्हणून अनेक संधी असून नवीन पिढीने व तरुणांनी विमा व्यवसायात पदार्पण करावे व आत्मनिर्भर व्हावे, असे आवाहन चंद्रशेखर पटवर्धन यांनी केले आहे.
मिलियन डॉलर राउंड टेबल ही अमेरिकेत 100 वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. दरवर्षी जगभरातील 30 हजार विमा प्रतिनिधी अमेरिकेतील संमेलनात सहभागी होतात. हा बहुमान प्राप्त करण्यात विमा अधिकारी पटवर्धन यांचे मोलाचे मार्गदर्शन, सूचना कोरोना काळात सक्षम पाठिंबा लाभल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले. या सर्वांचे अभिनंदन शाखाधिकारी हेमंत जोशी व उपशाखाधिकारी प्रशांत कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button