
जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व नर्सिंसची कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न -नामदार उदय सामंत
एकीकडे करोनाचे रूग्ण जिल्ह्यात वाढत असतानाच जिल्हा शासकीय रुग्णालयात अन्य आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व नर्सिंसची कमतरता आहे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वत्र प्रयत्न चालू आहेत अशी माहिती नामदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी वॉकिंग इंटरव्ह्यू घेण्यात येत आहेत परंतु त्यांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी आमदार राजन साळवी हे प्रयत्न करीत आहेत ते कोल्हापूर व पुणे येथील एजन्सीशी बोलणे करीत असून त्यांच्यामार्फत पदे भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com