
कामगाराने मालकाची दुचाकी आणि तीन कामगारांचे मोबाईल असा ४६ हजाराचा मुद्देमाल पळविला.
सेन्ट्रींगच्या कामावरील एका कामगाराने मालकाची दुचाकी आणि तीन कामगारांचे मोबाईल असा ४६ हजाराचा मुद्देमाल पळविला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहिनूर मंडळ (रा. मुळ कोपा, ता. पैकुर. जि.बिरभुम-पंश्चिम बंगाल) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना १३ ते १४ जून सकाळी सातच्या सुमारास बौद्धवाडी- घडली.फिर्यादी मोतीराम बासु राठोड (वय ४४, रा. देवूर हिप्परगी ता. देवर-हिप्परगी, जि. विजयपुरा, कर्नाटक. सध्या नवलाई मंदिर, पावस, रत्नागिरी) यांच्याकडे संशयित शाहिनूर हा कामाला आला होता. त्याने राठोड यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच-०९ एफएच-६१३२) आणि अनिल प्रोमू राठोड, अजित तुकाराम चव्हाण व विनोद गांधी राठोड यांच्या मालकीचे तीन मोबाईल पळविले. या प्रकरणी मोतीराम राठोड यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




