काेविड रूग्णालयाच्या “आओ जाओ घर तुम्हारा” कारभारावर नामदार उदय सामंत यांची नाराजी ,रुग्णाला भेटायला येणाऱ्या नातेवाईकांची RT-PCR टेस्ट करण्याचे आदेश
रत्नागिरी उद्यमनगर येथील महिला काेविड रुग्णालय येथे चालत असलेल्या “आओ जाओ घर तुम्हारा” या कारभाराबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी रत्नागिरी येथील महिला रुग्णालयात म्हणजे काेविड रुग्णालयातील कारभाराबाबत मंत्रिमहोदयांसमोर वस्तुस्थिती मांडली या रुग्णालयात कोरोना रूग्ण दाखल असून रुग्णालय पूर्णपणे भरलेले आहे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी त्यांचे घरचे नातेवाईक मोठ्या संख्येने येतात त्याचा बराच काळ तेथे वावर असतो हेच नातेवाईक आपल्या करोना रूग्णांना भेटून घरी जात असतात या रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी असते हे नातेवाईक परत आपल्या घरी व गावात जात असल्याने ते करोना चा प्रसार करू शकतात ही बाब पत्रकारांनी निदर्शनास आणली एवढेच नव्हे तर दाखल असलेल्या कराेना रुग्णांचे कपडे धुण्यासाठी त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जातात त्यामुळे एकापरीने हा करोना पसरवण्याचे प्रकार असल्याचे व त्याकडे रूग्णालय व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे पत्रकारानी मंत्रिमहोदयांच्या समोर मांडले हा प्रकार कळल्यावर नामदार सामंत यांनी नाराजी व्यक्त केली हा प्रकार अत्यंत घातक आहे प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने नातेवाईकांची गर्दी कमी करावी तसेच जे नातेवाईक भेटायला येणार आहेत त्यांची RT-PCR टेस्ट करावी असे आदेश दिले
www.konkantoday.com