
तर इंडिया आघाडी आणि काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या, याचाही तपास व्हायला हवा-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता EVM हँकिंगचा मुद्दा समोर आला आहे. यावरुन राहुल गांधी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.ते म्हणाले की, ‘सलग तिसऱ्यांदा सत्तेबाहेर असल्याने राहुल गांधी EVM हॅकिंगचा मुद्दा उपस्थइत करत आहेत. ईव्हीएम भाजपने नाही, काँग्रेस सरकारने आणले होते. ईव्हीएम हॅक झाल्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत असतील, तर सर्व विरोधी पक्षांनी एकमताने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनेच निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले पाहिजे. निवडणूक आयोगानेही वारंवार ईव्हीएम हॅक करून दाखवा, असे आव्हान दिले होते, पण कुणीच पुढे आले नाही, अशी टीका आठवले यांनी केली. इंडिया आघाडीने 234 जागा कशा जिंकल्या?ते पुढे म्हणतात, लोकशाहीत ईव्हीएमवर वारंवार प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. रवींद्र वायकर यांच्या विजयात राहुल गांधी ईव्हीएम बिघाडाचा ठपका ठेवत असतील, तर इंडिया आघाडी आणिकाँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या, याचाही तपास व्हायला हवा.www.konkantoday.com