वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करुन खाजगी रुग्णालयांना कोरोना उपचार केंद्र म्हणून अधिकृत मान्यता देण्याची समविचारीची मागणी.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होत आहे.वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने शासकीय रुग्णालये कमी पडत आहेत या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य निकषांवर आधारे पूर्ण उपचार पद्धतीसाठी खाजगी रुग्णालयांना अधिकृत परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या पत्रात समविचारीचे सर्वस्वी बाबा ढोल्ये,राज्य महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवाध्यक्ष अँड.निलेश आखाडे,तालुकाध्यक्ष आनंद विलणकर आदींनी हे पत्र दिले आहे.
सदरच्या पत्रात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या त्यामानाने बेड्सची कमतरता,शासकीय रुग्णालयातील अपुरी कर्मचारी संख्या,काही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांचा अभाव यातून रुग्णांची परवड होत आहे.इतर जिल्ह्यातही बेड्सची उपलब्धता नाही.तरी खाजगी रुग्णालयांना योग्य नियमांआधारे रितसर पूर्ण उपचार सेवेला प्राधान्याने अधिकृतपणे ‘डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटल’ म्हणून मान्यता देण्यात यावी असे म्हटले आहे.
पहिल्या फेरीच्या सुरवातीपासून आम्ही शासकीय आरोग्य यंत्रणेतील अपेक्षित सुविधा सुचवित आलो आहोत.तरीही काही बदल झाले नाहीत.ज्या खाजगी आस्थापना सेवा देण्यास स्वेच्छेने तयार आहेत तिथे योग्य पडताळणी करुन अशा रुग्णालयांना मान्यता देण्यात यावी.परजिल्ह्यात जाऊन उपचार घेणे महागडे होत असून खाजगी रुग्णालयांना मान्यता देऊन स्थानिक स्तरावर व्यवस्था झाल्यास रुग्णांच्या दृष्टीने हितकारु ठरेल असेही समविचारी ने या पत्रात नमूद केले आहे.
www.konkantoday.com