
वाढती गरज लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात नवे ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार – नामदार उदय सामंत
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते यामुळे सर्व जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा अशी सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्याने आज रत्नागिरी जिल्ह्यातील कोराेना परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली रत्नागिरी शहरातील महिला रूग्णालय व जिल्ह्यातील कामथे, कळंबस्ते राजापूर, दापोली,येथे ऑक्सिजन प्लांट उभे करण्यात येणार असल्याची माहिती नामदार उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली रत्नागिरीतील महिला रुग्णालयातील ऑक्सिजन प्लॅनसाठी नव्वद लाखांची तरतूद करण्यात आली असून इतर ठिकाणच्या जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लॅन्टसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत हे ऑक्सिजन प्लांट महिनाभरात उभे राहतील सध्या जिल्ह्यात २८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा असून तो दोन ते तीन दिवस पुरू शकणार आहे असेही सामंत यांनी सांगितले रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट चार दिवसांत सुरू होईल असेही सामंत यांनी सांगितले रत्नागिरी जिह्यातील कोराेना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन बेडची परिस्थिती नाजूक आहे यासाठी ऑक्सिजन बेडदेखील वाढवण्यात येणार आहेत यासाठी रत्नागिरी शहरातील महिला रुग्णालय येथे ऑक्सिजनचे तीस बेड तर सिव्हिल हॉस्पिटल येथे ऑक्सिजनचे तीस बेड तयार केले जात आहेत जिल्ह्यात लसीकरणाचे काम योग्य रीतीने चालू असून एक दिवस आड लसींचा पुरवठा होत आहे सध्या १ लाख १९हजार८३जणांचे लसीकरण झाले असून त्यापैकी १६ हजार जणांचा दुसरा डोस झाला आहे असे सामंत यांनी सांगितले
www.konkantoday.com