रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी,विनाकारण फिरणाऱ्यांकडून सुमारे पाच लाखाचा दंडवसूल
रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी काळात कडकअंमलबजावणी सुरू आहे जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर तब्बल पाच हजार वाहने तपासण्यात आली.यात विनाकारण फिरणाऱ्यांकडून सुमारे पाच लाखाचा दंडवसूल करण्यात आला. तर या दरम्यान जिल्ह्यात सुमारे ५६० जणांची काेराेनातपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये ३१कोरोबाधित सापडले आहेत. मास्क न वापरणाऱ्यां कडूनदीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला.राज्य शासनाकडून गेल्या दोन दिवसापासून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यातही महसूल वपोलीस यंत्रणेकडून संचारबंदीची अंमलबजावणी जोरातसुरु आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यां विरोधात जोरदार मोहिम गेल्या दोनदिवसा पासून सुरु आहे. जिल्ह्यात ८३ ठिकाणी नाकाबंदीकरण्यात आली आहे. दोन दिवसात पाच हजार वाहने
तपासण्यात आली. यावेळी १० हजार लोकांचीही चौकशीकरण्यात आली.
www.konkantoday.com