
आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर -मंत्री आदित्य ठाकरे
राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता. दरम्यान, आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर आहे, असं प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसंच सध्या रेमडेसिवीरचा होत असलेला काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रासोबत आणि काही कंपन्यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रशासनानं चर्चा केली आणि आता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता दूर झाली आहे.
www.konkantoday..com