कोव्हीड रिपोर्ट मिळण्यासाठी वेळेचे बंधन बंद करुन दिवसभर रिपोर्ट मिळावे संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांची मागणी

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या कोव्हीड रिपोर्ट मिळण्यासाठी सकाळी ११ ते १२ व सायंकाळी पाच ते सात अशी वेळ ठेवली आहे.खरंतर जिल्ह्यातून कोव्हीड टेस्ट साठी लोक येत असतात व सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना थांबावे लागते.नंतर त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन मिळत नाही शिवाय सध्या लॉक डाउन असल्याने फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी रिपोर्ट हे दिवसभर मिळावेत व परदेशात जाणा-या लोकांना २४ तासांचे आतच रिपोर्ट देण्यात यावेत.रिपोर्ट वेळेवर न मिळाल्याने परदेशात जाणा-या लोकांचे विमान तिकीट वाया गेलेले असून केवळ वेळेत रिपोर्ट न मिळाल्याने सुमारे २५ हजारांचा आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागत आहे.
ही बाब गंभीर असून मा जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांनी यांचा गांभीर्याने विचार करून योग्य तो न्याय द्यावा ही विनंती संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांचे वतीने करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button