कोविड योद्ध्याच्या दुचाकी बंद पडल्यास त्यांना सेवा देण्यासाठी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लबचा पुढाकार
कोविड योद्ध्याच्या दुचाकी बंद पडल्यास त्यांना सेवा देण्यासाठी मेकॅनिक स्कील डेव्हलपमेंट क्लबचे पदाधिकारी पुढे आले आहेत.
लॉकडाऊन काळामध्ये पोलीस, वैद्यकीय क्षेत्र तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेत काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांची सध्या मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे.सर्वच सेवा बंद राहिल्याने कोरोना योद्ध्यांच्या दुचाकी बिघडल्या तर त्या तातडीने दुरुस्त करून देण्यासाठी मॅकेनिक स्कील डेव्हलपमेंट क्लब रत्नागिरीचे सदस्य बंद पडलेली दुचाकी शक्य असल्यास जागेवर अथवा गॅरेजला आणून त्याची दुरुस्ती करून देण्यासाठी तयार आहेत.क्लबच्या सदस्या कल्याणी शिंदे, राजू पोमेंडकर, विनोद कळंबटे, सुशील कदम हे सदस्य दुचाकी बंद पडल्यास ती दुरुस्त करून देणार आहेत. तसेच दुचाकी ब्रेकडाऊन झाल्यास मोहसीन वणू, मशाक कुरणे, सचिन सनगरे, शशिकांत शिंदे, वैभव लिंगायत, कुंदन पालकर हे सदस्य सेवा देणार आहेत
www.konkantoday.com