
औषध दुकानांमध्ये डिस्काऊंटचे फलक लावता येणार नाहीत
राज्यातील औषध दुकानांमध्ये दर्शनी भागावर औषधांवर 50 ते 80 टक्के आभासी डिस्काऊंट देणारे फलक लावणे हा रुग्णाला प्रलोभन दाखविण्याचा प्रकार आहे. तेव्हा असे फलक दुकानांच्या प्रवेशद्वारावरून तातडीने हटवावेत, असे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने दिले आहेत.रुग्णांना औषधांच्या बिलावर डिस्काऊंट देणे गैर नाही. वास्तवात जेवढा डिस्काऊंट देता येऊ शकतो, त्यालाही हरकत नाही. मात्र, जे अशक्य आहे, जे दिले जात नाही, अशा डिस्काऊंटचे फलक लावून रुग्णांची दिशाभूल करणे बेकायदेशीर आहे, असेही अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.
www.konkantoday.com