रुग्णालयातील रुग्णशय्यांचे (बेड्स) व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिलेत. “रुग्णालयातील रुग्णशय्यांचे (बेड्स) व्यवस्थापन आणि प्राणवायू पुरवठा, औषधांची उपलब्धता या सर्व बाबींवर विशेष लक्ष द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
www.konkantoday.com