
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप मिळाले नाही
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन अद्याप न मिळाल्याने वयोवृध्द कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयाचे हाल होत आहेत. आर्थिक वर्ष समाप्तीचे कारण पुढे करीत जिल्हा परिषदेकडून निवृत्त वेतन बँक खात्यात जमा करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना व दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दरमहा निवृत्त वेतन देण्यात येते. मात्र, गेले सहा महिने अनेक कारणामुळे निवृत्ती वेतनास दिरंगाई होत आहे. जिल्हा परिषदेच्या वयोवृध्द कर्मचाऱ्यांनाच निवृत्ती वेतनासाठी दरमहिन्यात प्रतीक्षा करावी लागत आहे.
www.konkantoday.com