पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे हे मतदान १२तासांचे असणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह १९ उमेदवार रिंगणात आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
www.konkantoday.com