रिलायन्सच्या जामनगर प्लान्टमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात येणार
राज्यातील कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठ्यातील अडचणी दूर करतानाच सध्या असलेली वाढती मागणी लक्षात घेऊन रिलायन्स कंपनीला वाढीव ऑक्सिजन देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानुसार रिलायन्सच्या जामनगर प्लान्टमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवण्यात येणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिली.
www.konkantoday.com