महिला रुग्णालय येथील काेराेना टेस्टिंग केंद्र आता शिर्के हायस्कूल येथे हलवण्यात आले

रत्नागिरी महिला रुग्णालय येथे असलेले काेराेना टेस्टींग केंद्र आता शिर्के हायस्कूल येथे हलवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे
आज महिला रुग्णालय येथे अनेक लाेक व व्यापारी आरटी पीसीआर टेस्टिंगसाठी गेले असता तेथे त्यांना बरेच काळ खोळंबून राहावे लागले हाेते याबाबत जागृत पत्रकारानी ही माहिती जिल्हा प्रशासनाला दिली हाेती
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेऊन हे तपासणी केंद्र आता उद्या पासुन शिर्के हायस्कूल येथे हलवण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button