नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये -शिवसेना खासदार विनायक राऊत

ज्याचं राजकीय आयुष्यच मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केलाय. मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी लिहिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नियुक्तीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यावरुनच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आज अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. यानंतर राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केलायविनायक राऊत म्हणाले, “ज्याचं राजकीय आयुष्यचं मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये. नारायण राणेंच्या विरूद्ध आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या. या जमिनी वन खात्याच्या किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणं आज सुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमाने आणि तेवढ्याचं निर्धाराने महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात ठेवण्याचं काम करत आहेत. हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे शिस्तीचं आणि कोरोना नियंत्रित ठेवण्याचं पूर्णपणे पालन केलं जातंय. मात्र, ज्यांना काविळ झालेली त्यांना सगळचं पिवळं दिसतं असेही राऊत म्हणाले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button