कामथे उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी अचानक ऑक्सिजनचा तुडवडा
चिपळूण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू असताना आरोग्य यंत्रणेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी अचानक ऑक्सिजनचा तुडवडा भासल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर आमदार भास्कर जाधव, शेखर निकम यांच्या प्रयत्नांतून खडपोली औद्योगिक वसाहतीमधून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे रुग्णांसह आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला.
www.konkantoday.com