विनम्र आवाहन

माणसाला रक्ताची गरज लागल्यास माणसाचेच रक्त द्यावे लागते त्यासाठी ऐच्छिक रक्तदान
करणे गरचेचे आहे. हे माहित झाल्यावर आपण स्वयंस्फुर्तीने ऐच्छिक रक्तदान अभियानात
सर्वोतोपरी सहभागी व्हावे, समाजहितासाठी निस्वार्थी पणे राष्ट्र सेवेच्या भावनेतून नियमित
तसेच गरजेच्या वेळी ऐच्छिक रक्तदान करावे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून
रक्तदान कार्य व रक्तपेढीचे कार्य जाणून घेतले घ्यावे. आपल्या जवळच्या रक्तपेढीत जाऊन
रक्तदानाच्या समस्या समजावून घेतल्या पाहिजेत गरजे प्रमाणे रक्तदाते तयार करून आपल्या
बरोबर रक्तदान शिबिरात सहभागी करावे. त्यांनाही या बाबत जागृत केले पाहिजे, ऐच्छिक रक्तदात्यांचा
गट तयार करून गरजेनुसार रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे.
एक कार्यक्षम स्वयंसेवक म्हणून गरीब, गरजू रुग्णांसाठी धावून जाऊन मदत कार्य म्हणून रक्तदान अभियान राबवावे, हे कार्य आपण आजच सुरू करावयास हवे कारण अचानक आपल्या पैकी कोणाला रक्ताची नितांत गरज लागते आपण सर्व पळापळ करतो पण रक्तदाता मिळत नाही. कारण रक्तदानाबद्दल गैरसमज,अज्ञान असल्याने आपण काहीही करू शकत नाही त्यामुळे आपल्या पदरी निराशाच येते. आपण अपत्यासाठी ,रक्तातल्या नात्यांसाठी निरूपयोगी ठरलो याची खंत झटत राहते. आपणास
जाग येते परंतु तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. तरी सुद्धा आपल्या रूग्णाची गरज भागलेली असते. कोणाकडून तर कोणीतरी अपरिचीत व्यक्ती सेवाभावी वृत्तीने अशाच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केलेले असते ते रक्त तुमच्या रूग्णाला मिळाले. त्यामुळे आपल्या रूग्णाचे
प्राण वाचतात आपणास थोडा वेळ हायसे वाटते. कोणीतरी देवदूतासारखा येतो, ऐच्छिक
रक्तदाता बनून आपल्या रूग्णांचे प्राण वाचवतो, जे आपण आपल्यासाठी नाही करू शकलो ते परका करतो आणि आपण त्याचे कायम ऋणी होऊन जातो.

अशाच प्रकारे समाजात अनेक रूग्ण असतात त्यांच्याकडे रक्तदानासाठी कोणीच नसते असाच एखादा ऐच्छिक रक्तदाता बनून आपणही समाजाचे ऋण फेडू शकतो म्हणूनच संगमेश्वर तालुका आदर्श गाव निर्माण सेवा संघ, रिलायंस् फाऊंडेशन, रत्नागिरी या संस्थाच्या वतीने सिव्हिल हाॕस्पिटल रत्नागिरी मदतीने
शनिवार दि.१५फेब्रु. २०२० रोजी सकाळी १०ः०० ते ०४ः००वा. पर्यंत
श्री अंत्राळदेवी गावमंदिर देवळी,कानरकोंड आंबेड बुll (वांद्री मार्गे)
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .तरी आपणांस आवाहन करण्यात येत आहे की , रक्तदानाच्या मानवतावादी कार्यास हातभार लावून सहकार्य करावे. हे आवाहन आहे. रक्तदानाने साधनाऱ्या आपुलकीचे , कुणा गरजू रुग्णांचे प्राण वाचतील. धन्यवाद..
आपला….
आदर्श गाव निर्माण सेवा संघ, आंबेड बुll, संगमेश्वर, रत्नागिरी.
संपर्कः 9970078591
7972873272

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button