अंमलबजावणी आदेशाबाबत समन्वय नाही ,नागरिकांच्यात व व्यापाऱ्यांच्यात संभ्रम
कोराेनाचा वाढत्या प्रादुर्भावावर जिल्हा प्रशासनाने नियमावली केली असून त्याबाबत नियमावली नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे काही अधिकार स्थानिक पातळीवर तहसीलदार यांना दिले आहे मात्र एखाद्या आदेशाची अंमलबजावणी करताना परस्पर आदेश काढले जात आहेत त्यामुळे व्यापार्याच्यात व जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे काल रत्नागिरीच्या तहसीलदारानी एक आदेश काढला असून हा आदेश त्यांनी आपल्या मोबाइलच्या स्टेटसला ठेवला होता या आदेशात त्याने असे म्हटले आहे की आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानेदेखील बंद राहतील त्यांना फक्त घरपोच सेवा देता येईल दुकाने उघडी दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे विशेष म्हणजे तहसीलदारानी काढलेला हा आदेश प्रसिध्दी माध्यमांनाही देण्यात आला नाही वास्तविक करोना संदर्भातील माहिती घेण्यासाठी व आदेश संदर्भात माहिती देण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व पत्रकारांचा समावेश असलेला ग्रुपतयार करण्यात आला आहे त्यावरही तहसीलदारानी हा आदेश प्रसिद्ध केलेला नाही कोरोनाची परिस्थिती पाहता काहीवेळेला प्रशासनाला अचानक काही निर्णय घेणे भाग पडणार असले तरी किमान जनतेला वेळेत माहिती मिळणे आवश्यक आहे यासाठी निदान प्रसिद्धी माध्यमापर्यंत तरी हे आदेश पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा त्याची माहिती न मिळाल्याने नाहक जनतेत संभ्रम निर्माण होऊ शकतो
www.konkantoday.com