
रत्नागिरीतील या परिस्थितीला जबाबदार कोण?जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या विषयाकडे गांभिर्याने पाहिलेच नाही का ?- सामाजिक नेते संतोष सावंत
मित्रानो कोरोनाचे पेशंट हां-हां म्हणता आपल्या रत्नागिरी मधेही वाढू लागलेत ते ज्या प्रमाणात वाढत आहेत ते बघता आपल्या सर्वसाधारण रुग्णालय आणि महिला हाॅस्पिटल म्हणजे आताच कोविड रूग्णालय पण आता तेही फुल झाले आहे आणि आता सर्वसाधारण रुग्णालयच देखिल कोरोना रूग्णालयात रूपांतर केल म्हणजे ते केल्याशिवाय पर्याय देखिल नाही पण खरच हे सर्व पेशंट हाताळण्याची ताकद हा रूग्णालयाची आहे का ? हा माझा पहिला महत्वाचा प्रश्न आपला ग्रामीण भाग हां या रूग्णालयावर अवलंबून असतो कारण खाजगी दवाखान्यांचे दर काही माणसांना परवडत नाही म्हणून सर्वसाधारण रुग्णालय नेहमीच फुल असतात.आपल्या सर्वसाधारण रुग्णाललयाची सद्य स्थिती ची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता फारच भयावह परिस्थीती आणि तितकीच लाजिरवाणी आहे
आपल्या सिव्हिलची वस्तुस्थिति आज मांडण्याचा मी प्रयत्न करतोय त्यावरून जनतेने आणि जिल्ह्यातील सर्व लोकांनी याचा बोध घ्यावा आपल्या रूग्णालयाला क्लासवन म्हणजे यात सिव्हिल सर्जन व अन्य डाॅक्टर यांची एकुण मंजूर पद १९ आहेत त्यापैकि आज फक्त १ डाॅक्टर उपलब्ध आहे बाकी १८ पद रिक्त आहेत
**क्लास २ यामधे फिजीशियन २ पदे आहेत दोनही रिक्त,बालरोगतज्ञ जागा ३ या तीनही जागा रिक्त आहेत
शल्यचिकित्सक दोनही जागा रिक्त,नेत्रतज्ञ दोनही जागा रिक्त,क्ष किरणतज्ञ तीही जागा रिक्त आहे
* अपघात वैद्यकीय अधिकारी क्लास २ एकुण जागा ९ पैकि ४ भरलेल्या ५ रिक्त आहेत म्हणजे एकुण मंजूर पदे ३० आहेत त्यातील ११ पदे रिक्त आहेत.
क्लास ३ मंजूर पदे ६२ यात (रक्तपेढी तज्ञ, प्रयोग शाळा तज्ञ,रूग्णवाहिका चालक) त्यातील ३४ पदे रिक्त आहेत.
क्लास ४ पदे मंजूर १३३ यातील ४३ पदे रिक्त
पदोन्नति ची एकूण १६ पदे आहेत त्यातील ८ पद रिक्त आहेत ही आजच्या तारखेची सध्याची सिव्हिल हाॅस्पिटलची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती सन २००६ पासूनची आहे तशीच आहे.
मित्रानो ही आजची परिस्थिती बघता सिव्हिलमधील पेशंट कड़े खरच लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे का ? जरा वैद्यकीय यंत्रणाच कमी असेल तर? असलेले डाॅक्टर तरी कोणाकोणाकडे लक्ष देणार? त्यातही मिळालेल्या माहिती नूसार गेल्या कोरोना काळात ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांचे आजपर्यंत मानधन देखिल मिळालेल नाही? मग आजच्या या परिस्थिती ला जबाबदार कोण ? जिल्ह्यातील लोकप्रतिनिधि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या विषयाकडे गांभिर्याने पाहिलेच नाही का ?असा प्रश्न निर्माण होतो आहे आणि मग खरच याच दवाखान्यात आता कोरोना रूग्णांवर खरच उपचार होतील का ? या तीन दिवसातील मृतांचा आकडा पहाता हां मोठा प्रश्न उभा राहिला आहे ?
संतोष सावंत, नाचणे रत्नागिरी
www.konkantoday.com