
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फक्त साठ टक्केच आंबा वाशी बाजारपेठेत रवाना
वादळ अवकाळी पाऊस व अन्य कारणांमुळे यंदा आंब्याचे पीक धोक्यात आले आहे हवामानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादन एकूणच कमी आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू झाला असून, अनेक बागायतदारांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत यंदा ६० टक्के आंबाच या मुहूर्तावर मुंबईत गेला आहे. मुहूर्तासाठी सोमवारी तोडलेला आंबा मंगळवारी विक्रीसाठी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आला होता. साधारणत: पाडव्याला ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होते. मात्र, यावर्षी ३४ हजार १९ आंबा पेट्या विक्रीसाठी उपलब्ध होत्या.
www.konkantoday.com