कोविडला घालावायचं असेल तर सर्वानी मिळून लढा दिली पाहिजे -नामदार उदय सामंत
राजकारण न करता कोविडला नष्ट करायचा असेल तर सर्वांनी मिळून हा लढा देण्याचा सर्वपक्षिय संकल्प केला असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सामंत पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील अधिकारी ,व्यापार्यांची बैठक झाली, सर्वपक्षिय बैठक घेतली. टास्क फोर्स कशी कारवाई त्याची बैठक झाली.बैठकीला सेनेकडुन खासदार विनायक राऊत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भोसले, रमेश कीर, राष्ट्रवादी बशिर मुर्तुझा, भाजपर्फत विनय नातू, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, बाळ माने, मनसेचे वैभव खेडेकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदी उपस्थित होते. यामध्ये अॅक्शन प्लॅन करण्यात आला.
त्यासाठी नवीन कोविड सेंटर, आरोग्य व्यवस्थेची तयारी, कशी असावी. हे निश्चित झाले. तशी तयारी प्रशासनाने केली आहे. अडीज हजाराच्या वर बेड आहेत. त्यामध्ये ऑक्सिन बेडपासून इतर बेडची व्यवस्था आहे. टास्क फोर्सशी चर्चा झाली. त्यांनीही काही काही सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.असेही त्यांनी सांगितले
www.konkantoday.com