
आजपासून लसीकरणाचा सुरवात –उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत
जिल्ह्यात लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. रुग्ण संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. एक नवे फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरासह तालुकास्तरावर खाजगी डाॅक्टरांच्या सहकार्याने कोरोना सेंटरमध्ये उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com