
रत्नागिरीच्या डिमार्ट मध्ये आणखी कर्मचारी कोरोना बाधित आढळले
रत्नागिरी शहराजवळील डीमार्टमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली असतानाच डिमार्टमधील कर्मचारी कोरोना बाधित आढळत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सोमवारी डिमार्टच्या कर्मचाऱ्यांपैकी दोन जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले हाेते त्यानंतर उर्वरित कर्मचार्याची तपासणी केली असता आणखी तीनजण कोरोना बाधित आढळले आहेत त्यामुळे आता डी मार्टच्या पाच कर्मचा यांना कोरोनाची लागण झाली आहे असे असले तरी डी मार्टमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करत असल्याने प्रशासनाने याबाबत कोणतेही खबरदारी घेतली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे
www.konkantoday.com