बाळासाहेबांनी मला दिलेला सल्ला माननीय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबाना पण द्यावा – ना.उदय सामंत

मी पंढरपूरला प्रचाराला आलोय हे नक्की.पण माझ्या जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडून आणि आदरणीय बाळासाहेबांनी मला दिलेला सल्ला माननीय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबाना पण द्यावा

कारण ते पण नागपूरला कोविड पेशंटची संख्या वाढत असताना पंढरपूरच्या वारीला होते पण त्या राजकीय वादात न पडता मी बाळ माने साहेबांशी चर्चा करेन कारण
त्यांच्याशी बोलल्याने जर कोरोना जाणार असेल तर मी माझ्या जिल्ह्यासाठी राजकारण बाजूला ठेवायला कधीही तयार आहे जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सुरक्षतेसाठी मी कोणाशीही बोलायला तयार आहे बाळ माने तर माझ्यापेक्षा जेष्ठ आहेत त्यांच्याशी बोलायला आणि त्यांचा सल्ला घ्यायला ते जरी भाजप मध्ये असले तरी मला आवडेल..पण त्यांनी गैर समज पसरू नये ही त्यांना विनंती आहे
मी माझ्या परीने स्वतःशी आणि मतदारांशी प्रामाणिक राहून काम करतोय गेले वर्षभर नुसते सल्ले न देता मी आणि माझे सहकारी या कोरोना संकटात आघाडीवर राहून लढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोयसर्व प्रश्न चर्चेनेच सुटणार असतील तर मला सतत चर्चा करायला नक्की आवडेल
असो..आरोग्य यंत्रणेत त्रुटी असतील तर नक्की सर्वांशी चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न करू.टास्क फोर्स तयार आहे पण ते बाळासाहेबांना माहीत नसावे रत्नगिरी व्यापारी संघटने बरोबर बैठक मी पूर्वीच घेतली आहे.. व्यापारी बांधवांच्या पाठीशी कालही होतो आजही आहे आणि भविष्यात देखील राहणार त्याची कुणी काळजी करू नये आणि त्यामध्ये पण राजकारण करु नये
कारण मागच्या लॉक डाउन मध्ये त्यांच्या सोबत कोण होतआणि पुढे कोण राहणार आहे हे त्यांना चांगलं माहीत आहेत्याचा राजकीय फायदा कुणी उठवू नये.
आजच मी दुपारी व्यापऱ्यांबरोबर, दुपारी 3 वाजता सर्व पक्षीय पदाधिकारी यांचे समवेत आणि सायंकाळी ५ वाजता टास्क फोर्स बरोबर बैठक आयोजित केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button