
गुहागर-चिखली आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह
एकीकडे गुहागर तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५१ वर्षीय कर्मचार्याचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. या रूग्णाच्या संपर्कातील डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य १६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. तर आरोग्य विभाग सदरील व्यक्ती आणखी कोणाच्या संपर्कात आली होती याची माहिती गोळा करीत आहे.
www.konkantoday.com