जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणे वरील ताण कमी करण्यासाठी आता हेल्पिंगहॅन्डस पुढे सरसावली
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावरील ताण वाढू लागला आहे. संभाव्य लाॅकडाऊन आणि आरोग्य व्यवस्था या आनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहायभूत ठरावे, या उद्देशाने रत्नागिरी आणि परिसरातील विविध संस्थांचा समावेश असलेल्या ‘हेल्पिंग हॅंड्स’ हा फोरम पुन्हा तत्परतेने पुढे आला आहे. यादृष्टीने चर्चा करण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. गेल्या वर्षी या संस्थेने लॉक डाऊन च्या काळात जिल्हा प्रशासनाला वेगवेगळ्या उपक्रमात मदत केली होती
www.konkantoday.com