
राज्यात करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक, काल राज्यात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले
राज्यात करोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना दिसत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेतही लसींच्या तुटवड्यामुळे अडथळे निर्माण होताना दिसत आहे. राज्य शासन कठोर लॉकडाउन लागू करण्याच्या तयारीत आहे. निर्बंध अधिक कडक करण्यात आले असूनही रूग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. काल दिवसभरात राज्यात ६३ हजार २९४ करोनाबाधित वाढले असून, ३४९ रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.७ टक्के एवढा आहे. काल पर्यंत राज्यात ५७ हजार ९८७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात काल एकूण ५,६५,५८७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
www.konkantoday.com