रत्नागिरी जिल्ह्यातील अपुर्या आरोग्य व्यवस्थेबाबत माजी खासदार नीलेश राणे यांची नाराजी
रत्नागिरी जिल्ह्यातील अपुर्या आरोग्य व्यवस्थेबाबत माजी खासदार नीलेश राणे यांची नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी अपुऱ्या आराेग्य यंत्रणेबाबत ताशेरे ओढले. ते म्हणाले की, हे निग्लीजियन्स ऑफ ह्युमन लाईफ आहे. आपण न्यायालयतही जायला तयार आहाेत. निग्लीजियन्स ॲक्ट अंतर्गत या सगळ्या अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचणार आहे. परंतु, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इतके दिवस थांबल्याचे राणे यांनी सांगितले.राणे यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्तपदांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, जिल्हा आरोग्य विभागाकडे कर्मचारी नाहीत, आरोग्य व्यवस्था नाही. मग लस कशासाठी मागताय, त्याचे वाटप कसे करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यासाठी आणखी अडीच हजार बेड्स दिल्याचे जाहीर केले होते. त्यावर राणे यांनी मंत्री सामंत यांनी दिलेले बेड कुठे आहेत, ते दाखवावेत. ते बेड दाखवून दिल्यास आपण स्वत: बक्षीस देऊ, असे सांगितले.
www.konkantoday.com