
रत्नागिरीतील व्यापाऱ्यानी तुरळक प्रमाणात दुकाने उघडण्यास सुरुवात केली
रत्नागिरी बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी तुरळक प्रमाणात उघडण्यास सुरवात केली आहे यामध्ये हातगाडी चालकाचाही समावेश आहे शासनाने मात्र अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडण्यास तीस एप्रिलपर्यंत बंदी केली आहे परंतु व्यापाऱ्यांचे म्हणणे असे की आता ही दुकाने बंद ठेवली आहेच उद्या पूर्ण टाळेबंदी जाहीर झाल्यावर झाल्यावरही बंद ठेवावी लागणार आहेत या सर्वात छोटे व्यापारी भरडून निघणार आहेत यामुळे राज्यातही व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे असे असले तरी रत्नागिरी व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नाही जे व्यापारी दुकाने उघडत आहेत ते आपल्या जबाबदारीवर उघडत आहेत
संपूर्ण टाळेबंदी जाहीर होईपर्यंत तरी दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे
www.konkantoday.com