माजी लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांना लोटिस्माचा अपरान्त भूषण पुरस्कार
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्यावतीने देण्यात येणारा अपरान्त भूषण हा पुरस्कार लोकसभेच्या माजी अध्यक्षा आणि चिपळुणच्या सुकन्या श्रीमती सुमित्राताई महाजन यांना जाहीर झाला आहे. संचालक मंडळाने एकमताने यावर्षी सुमित्राताईना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह असे आहे. विशेष म्हणे आज सोमवारी सुमित्राताई महाजन यांचा वाढदिवस. या वाढदिवशीच कोकणवासियांनी त्यांना अनोखी आणि आनंदाची भेट दिली आहे.
www.konkantoday.com